तुह्या धर्म कोनचा ?

मराठी चित्रपट नुसता उभारीच घेत नाहीये तर वेगवेगळे प्रगल्भ विषय हि मांडतोय जे कि कुठल्याही हिंदी किंवा प्रादेशिक भाषांमध्येही अपवादानेच मांडले जात असतील .श्वास पासून सुरु झालेली हि मालिका आज मराठी चित्रपटांची उंची वाढवतच चालली आहे उमेश –गिरीश ,गजेंद्र अहिरे, सतीश मन्वर ,मंदार देवस्थळी यांसारखे दिग्दर्शक , संदीप कुलकर्णी ,उपेंद्र लिमये ,सचिन खेडेकर ,सुबोध भावे ,अमृता सुभाष,शरद पोंक्षे ,किशोर कदम यांसारखे मुरलेले अनेक कलावंत आणि सगळेच उत्कृष्ट गीतकार संगीतकार यामुळेच या चित्रपट सृष्टीला नवे चैतन्य आले आहे .
गाभ्रीचा पाउस ,देऊळ ,जोगवा ,या सारख्या सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या अजून एका चित्रपटाची निर्मिती होतीय. विषय आधी कधीच हाताळला गेला नाहीये .चित्रपट आहे “तुह्या धर्म कोनचा ?”

उपेंद्र लिमये ,किशोर कदम ,विभावरी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट सरळ धर्म आणि त्याच्या संकल्पना यांच्यावर प्रहार करणारा असा वाटतोय .

विविध धर्माचे विविध देव आणि त्यांच्या रंगविलेल्या अजब दंतकथा ,खरा देव कोणता यातील संघर्ष आणि आदिवासी समाजाकडून त्यांकडे बघण्याची दृष्टी .
हे सगळेच या चित्रपटामध्ये उत्तम मांडले असणार हे याच्या ट्रेलर मधूनच दिसते आहे ..गाभ्रीचा पाउस चा दिग्दर्शक सतीश मन्वर याचेच दिग्दर्शन या चित्रपटासाठी आहे . हा चित्रपट सर्व चित्रपट सृष्टीसाठी मैलाचा दगड ठरेल यात कुठली शंकाच नाही .आमच्या फुल to फिल्मी टीम कडून या चित्रपटाला खूप शुभेच्छा .

Advertisements

4 Comments Add yours

 1. महेंद्र म्हणतो आहे:

  श्वास च्या न्रिर्मिती नंतर त्याच्या डायरेक्टर प्रोड्य़ुसर ने दुसरा एकही चित्रपट गेल्या दहा वर्षात दिलेला नाही. श्वास चे यश एंजॉय करायला दोन एक वर्ष पुरेसे होते, पण नंतर तो प्रोडुइसर डायरेक्टर सगळेच अज्ञातवासात गेले. दुर्दैव मराठी सिनेमा चे.
  मराठी चित्रपट फक्त अनुदानासाठीच काढले जातात का? हा प्रश्न पण आहेच. हा सिनेमा जो येतोय, त्याचं पण मार्केटींग बरोबर केले नाही, तर तो पण बऱ्याच सिनेमा प्रमाणे दुर्लक्षित राहू शकतो.

  Like

  1. onkark म्हणतो आहे:

   बरोबर आहे महेंद्र काका .अनुदान घेऊन टुकार विनोदी चित्रपट नाहीतर सासू -सून फोर्मुला वापरून छपरी चित्रपट काढणे एवढ्यातच काही प्रोडूसर आपले भाग्य समजतात .

   Like

 2. ninad kulkarni म्हणतो आहे:

  मराठी सिनेमाचे वितरण , व जाहिरातबाजी मध्ययुगीन कालखंडातील आहे.

  Like

 3. pakpak म्हणतो आहे:

  svas che nirmaate aani pramukh kalakar aruna nalawade aahet. tyani aadhi pun baech changale kaam kela aahe aani nantar pan. digdarshakache adhihi nav kadhi aikale naahi aani nantarahi

  Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s