पुलंकित

सकाळी एक पोस्ट च्या निमित्ताने पुलंची आठवण होते आणि मग पुढचे तासभर आम्ही पुलकित झालेले असतो, लहानपणी घरी कधी संध्याकाळी नित्य हरिपाठ टेप वर वाजला नसेल पण असा मी असामी, हरितात्या, पेस्तनजी,रावसाहेब,चितळे मास्तर, नारायण अशा पुलंच्या कितीतरी व्यक्तिरेखांची पारायणे मात्र झाली..कधी पेस्टनजीच्या बोलण्याने सुखावलो हरितात्यांच्या वाक्यांनी मनमुराद हसलो, रावसाहेबांच्या शिव्यांनी पार लोळलो.. लग्नकार्यात नारायण शोधु लागलो, कोणाला उपदेश करायचा म्हटले की “बेमट्याss” हे पालुपद नेहमीचेच झाले… त्यांचे कथाकथन तर पाठच झाले आहे… पेटी वरची नाट्यगितांची पदेही अजुन डोक्यात आहेत..या वल्लीला जाऊन पुढच्या महिन्यात 16 वर्ष पूर्ण होतील यावर विश्वास बसत नाही कसा होईल म्हणा,आमच्या मराठीतल्या सहित्यविश्वाची सुरुवात ही त्यांच्यापासुन आणि शेवटही तिथेच , “ते आमच्या जगण्याचा च एक भाग झाले आहेत” हे वाक्य वापरून कितीही बुळबुळीत झाले असले तरी याबबतीत तंतोतंत खरे आहे …

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s