“चुंबक”

“चुंबक”
चांगला चित्रपट आहे, मराठीत वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट येत आहेत, असाच एक वेगळा, पूर्वी कधी न पाहिलेला, एक निरागस भावविश्व आणि जगण्यातली दुनियादारी यातलं द्वंद्व दाखवणारा चित्रपट !

स्वानंद किरकिरे यांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपटात भारीच सुंदर काम केलं आहे ! साहिल जाधव आणि संग्राम देसाई या मुलांनी पण सहजतेने आणि कमालीच्या आत्मविश्वासाने काम केले आहे! स्वानंद किरकिरे आणि साहिल यांनी साकारलेल्या “प्रसन्न आणि भालचंद्र” या पात्रांची केमिस्ट्री भन्नाट जमलीय.

पार्श्वसंगीत आणि संकलन थोडं अजून उत्तम करता आलं असतं पण त्याने एवढा अडथळा येत नाही ! स्वानंद किरकिरे गीतकार जरी असले तरी त्यांची वेगळी अशी एक विशेष गायकी आहे, यांच्या गाण्याचे आपण सगळेच फॅन, यात त्यांचं एखादं गाणं असावं असं वाटत होतं, पूर्ण गाणं नसेना का पण ” सुजन कसा मन चोरी” च्या दोनच ओळी पण मजा आणतात !

लेथ जोशी सारखाच हा पण पाहिले फिल्म फेस्टिव्हल्स मध्ये गाजलेला आणि नंतर पडद्यावर आलेला चित्रपट. हा नक्की पहा चित्रपटगृहात जाऊन. निराश होणार नाहीत प्रेक्षक !!

37966038_10157076506093274_2261285223188660224_o

यावर आपले मत नोंदवा