“मंद्र”

“मंद्र”, म्हणजेच गाण्यातला “Lower octave”, यात गाता आलं तरच गाणं आजलं.
कदाचित संगीत- नृत्य कलेसंदर्भात असेल म्हणून म्हणा , पण “आवरण” या कादंबरी नंतर साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कन्नड लेखक पद्मश्री एस. एल. भैरप्पांची उमा कुळकर्णी यांनी अनुवादित केलेली, मला सर्वात जास्त आवडलेली ही कादंबरी. (त्यांचीच तडा ही कादंबरी फार एकसुरी वाटलेली) हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले गायन आणि नृत्य या प्रकारातल्या प्रसिद्धीच्या यशोशिखरावर पोचलेल्या दोन मुख्य पात्र असलेल्या कलाकाराचे वैयक्तिक जीवन आणि सांगितिक जीवन मांडणारी कादंबरी. तसेच गुरू शिष्य नाते, कलेविषयीची श्रद्धा, कलाकाराचा अहं, स्वार्थ, व्यसन- वासना या सर्वच मानवी अंगांचा भैरप्पा यांनी कथा रुपात मांडलेला आलेखच आहे.
बरं ही कथा फक्त दोन मुख्य पात्रांचीच नाही तर त्यांच्याभवतीच्या इतर पात्रांचीही तेवढीच आहे!
कादंबरी तर उत्तम आहेच पण, कथा पुढे जात असताना पात्रांच्या बोलण्यातून, किंवा विचार करताना आलेल्या संगीत विषयक माहितींमधून भैरप्पा यांना संगीताविषयी असलेले अगाध ज्ञान आणि रुची दिसतेच!
एखाद्या शास्त्रीय संगीत आणि कथक नृत्याच्या अभ्यासकाला शोभेल असा अभ्यास त्यांचा ह्या कादंबरीतून दिसतो.
कलाकार त्याच्या कलेने ओळखला जावं त्याच्या वैयक्तिक आयुष्ययाने नव्हे. हे तर कादंबरी सुचवतेच पण, आयुष्यभर कलाकृतींना साथ देणारे सहकलाकार, कलाकारांना मनापासून सन्मान देणारे, प्रसंगी कलाकारांच्या पाठी उभे राहणारे रसिक यांचीही योग्य बाजु कादंबरी मांडते .
भैरप्पा त्यांच्या कथेतून अप्रत्यक्षपणे शेवटी तात्पर्य मांडत असतात ते मांडण्याची त्यांची हातोटी फारच उत्तम .
वाचली नसेल तर नक्की वाचावी या सदरातील ही कादंबरी !
IMG_20181103_160006.jpg

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s