Date:25th September 2019
भयानक पाऊस पडतोय, एक तासापासून जे एम रोड ला अडकलोय, निघायचा प्रयत्न केला पण पाऊस कमीच होईना शेवटी चकचकीत VanHusen JM Road च्या शो रूम समोर थांबलो बाहेरच एक फूगेवाल्याची बाळाचा पाळणा अडकवलेली सायकल दिसली, वाटून गेलं काय झालं असेल त्यांचं?
पूर्ण भिजल्यामुळे बाहेरच पायऱ्यांवर थांबलो आहे, तसं एरवीही का कुणास ठाऊक असल्या चकचकीत ब्रँडेड दुकानांच्या आत जाण्याचा न्यूनगंड आहे अजूनही..
आत डोकावून पाहिले तर फुगेवाला मस्त बसलाय शोरूम मध्ये आत आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन , आताच थोडा वेळ कोट घातलेला सेल्समन मस्त खेळून गेला बाळासोबत ! जग सुंदर आहे पण हे दिसण्यासाठी असली छोटी संकटे सुद्धा नको हातावर पोट असलेल्या माणसांसाठी … पूर्ण भिजलोय पण या दृश्यामुळे चेहऱ्यावर कटकटीचे भाव नाहीयेत तर स्मितहास्य आहे …
– ©ओंकार प्रमोद कुलकर्णी
……
मित्रांनो आपला मिळणारा प्रतिसाद पाहून मी खूप हरखुन गेलो आहे, पोस्ट कुठे सोशल मीडियावर शेअर करायची असल्यास माझ्या नावसाहित पोस्ट केलीत तर मला जास्त आवडेल